सामन्यापूर्वी विराटाचे ट्विट ; मुंबई इंडियन्सला सावधगिरीचा इशारा

मुंबई इंडियन्स

चेन्नई : आयपीएलच्या 14 पर्वाला आज पासून सुरुवात होत आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील यशानंतर भारतीय खेळाडू देशातील लोकप्रिय असलेल्या आयपीएलसाठी सज्ज झालेत. आजचा पहिला सलामीचा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर  यांच्यात होणार आहे. आज साडे सात वाजता चेन्नईच्या चिन्नास्वामी मैदानावरुन या सामन्याला सुरुवात होईल.

या आयपीएल हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू जिकंण्याच्या वृत्तीने मैदानात उतरणार आहे. आरसीबीने ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल आणि न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काइल जेमिसनला संघात सामील करून घेतले आहे. त्यामुळे आता आरसीबी संघ भक्कम असल्याचे दिसत आहे.

आयपीएल सुरु होण्याआधीच आरसीबीचा कॅप्टन विराट कोहली याने ट्विट केले आहे. कोहलीने आपल्या ट्विटरवरुन 4 फोटो शेअर केले आहेत. ‘मी फोकस्ड आहे… आणि पुढे जाण्यासाठी मी तयार आहे’, असे म्हणत कोहलीने मुंबई इंडियन्सला चॅलेंज केल्याचं दिसत आहे. सामन्यापूर्वीच आरसीबीने जिंकण्याची वृत्ती दाखवून दिली आहे.

भारतीय वेळेनुसार सामन्याला ठीक 7.30 वाजता सुरुवात होणार आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील पहिल्या सामन्याचं थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर तुम्हाला बघायला मिळेल.

महत्त्वाच्या बातम्या :