अखेच कर्णधार म्हणून विराटचा प्रवास संपला; सामन्यानंतर व्यक्त केल्या भावना म्हणाला…

अबुधाबी : आयपीएल आता शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहचली आहे. आयपीएलचा हा महासंग्राम आता रोमांचक वळणावर येऊन पोहचला आहे. ज्या संघाला आयपीएल विजयचा प्रबळ दावेदार मनला जात होता तो संघ आता स्पर्धेतून बाहेर झाला आहे. सोमवारी झालेल्या एलिमिनेटर मॅचमध्ये शारजाह मैदानावर कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात केकेराने आरसीबीवर मात करत विजय मिळवला आणि आरसीबी या पराभवासह आयपीएल मधून बाहेर पडली.

आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात फलंदाजी करताना आरसीबीचे फलंदाज सुनील नरेनच्या गोलंदाजीसमोर असहाय दिसला आणि 20 षटकांत 7 गडी बाद 138 धावा केल्या आणि केकेआरला विजयासाठी 139 धावांचे लक्ष्य मिळाले.केकेआरने 19.4 षटकांत 6 विकेटवर 139 धावा करत विजयाचे लक्ष्य गाठले आणि सामना चार गडी राखून जिंकला. या विजयासह, केकेआरने पात्रता 2 मध्ये स्थान मिळवले, तर आरसीबीचा प्रवास या पराभवाने संपला.

पराभवानंतर विराट संघाचे नेतृत्व करणार नसल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. सामन्यानंतर विराट कोहलीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सामन्यानंतर विराटने त्याच्या कर्णधारपदाच्या प्रवास कसा होता याबद्दल सांगितले आहे. यावेळी तो म्हणला, ‘मी संघात अशी संस्कृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला, आणि युवा खेळाडूंना संधीआणि स्वातंत्रपणे आणि विश्वासाने खेळू शकतात. ही गोष्ट मी भारतीय संघाबाबतही केली. मी माझे सर्वोत्तम दिले. मला माहित नाही प्रतिसाद कसा मिळाला, पण मी प्रत्येकवेळी संघासाठी 120 टक्के माझे सर्वोत्तम दिले आणि यापुढेही एक खेळाडू म्हणून मी देत राहिन. पुढच्या तीन वर्षांसाठी पुन्हा एकत्र येण्याची आणि पुनर्रचना करण्याची एक संधी आहे. मी बंगळुरूसोबत असणार आहे. मला निष्ठा महत्त्वाची आहे. आयपीएलमध्ये शेवटच्या दिवसापर्यंत बंगळुरू संघात खेळेन, अशा भावना व्यक्त करत विराट कोहली आपल्या चाहत्यांना दिलासा दिला.

महत्त्वाच्या बातम्या