विरेंद्र सेहवाग म्हणतो, ‘हा’ खेळाडू सचिनच्या १०० शतकांचा रेकॉर्ड मोडणार

टीम महाराष्ट्र देशा : भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागने मोठी भविष्यवाणी केली आहे. त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरच्या १०० शतकांचा रेकॉर्ड मोडेल असा विश्वास व्यक्त केला आहे. विरेंद्र सेहवागने एका मुलाखतीत हे विधान केले आहे.

विरेंद्र सेहवागने ‘सध्या विराट कोहली ज्या वेगाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावा काढतो आहे. ते पाहता सचिनचा शंभर शतकांचा विक्रम मोडायला त्याला फारसा वेळ लागणार नाही. विक्रम हे मोडण्यासाठीच असतात, आणि सचिनचा शंभर शतकांचा विक्रम विराट मोडेल असं माझं मत आहे असं विधान सेहवागने केले आहे.

दरम्यान, क्रिकेटचा देव असणाऱ्या सचिन तेंडूलकरच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतके आहेत. त्यात एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने ४९ तर कसोटी क्रिकेटमध्ये ५१ शतके झळकावली आहेत. तसेच त्याच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक ३४ हजार ३५७ धावांचा रेकॉर्ड आहे.

तसेच विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्या खोऱ्याने धावा काढत आहे. त्याने आतापर्यंत एकूण ६७ शतके झळकावली आहेत. त्यात कसोटीमध्ये २५ तर वनडेमध्ये ४३ शतके आहेत. त्यामुळे तो सचिनच्या एकदिवसीय शतकांचा रेकॉर्ड लवकरच मोडेल अशी शक्यता आहे.