भोपळा न फोडताच बाद झाल्याने ‘त्या’ वक्तव्यामुळे विराट होतोय ट्रोल

मुंबई : इंग्लंड दौऱ्यातील पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पावसाच्या व्यत्ययामुळे संपुर्ण दिवसाचा खेळ होऊ शकला नाही. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा भारतीय संघाने ४ गडी गमावत १२५ धावा केल्या होत्या. भारतीय संघ अद्यापही ५८ धावांनी पिछाडीवर आहे.

इंग्लंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना सुरु होण्यापुर्वी इंग्लंडच्या भूमिवरील भारतीय फलंदाजाची कामगिरीवरुन विराटला एक प्रश्न विचारण्यात आला होता. त्याला विचारण्यात आले होते की, ‘तु इंग्लंडचा अनुभवी गोलदांज जेम्स अँडरसनचा सामना कसा करशील’. या प्रश्नावर विराटने ‘मी केवळ बॅटींग करेन’ असे उत्तर दिले होते. यानंतर क्रिकेट रसीकांच्या नजरा सामन्यावर लागल्या होत्या की विराट आणि अँडरसन यांच्यातील सामना कसा होईल. मात्र सामन्यातील पहिल्याच चेंडुवर विराट भोपळा न फोडता अँडरसनचा शिकार बनला.

अँडरसनविरुद्ध दिलेल्या त्या प्रतिक्रियेनंतर विराटकडून या सामन्यात चांगल्या फलंदाजीची अपेक्षा होती. मात्र तसे घडले नाही उलट विराट भोपळा न फोडता बाद झाला. त्यामुळे तो सोशल मीडीयावर ट्रोल होत आहे. यापुर्वीही २०१४ साली इंग्लंड दौऱ्यात अँडरसनने विराटला खेळपट्टीवर टिकु दिले नव्हते. यानंतर मात्र २०१८च्या इंग्लंड दौऱ्यात कोहली एकदाही अँडरसनच्या गोलंदाजीवर बाद झाला नव्हता. मात्र यंदाच्या मालिकेत पहिल्याच सामन्यात तो अँडरसनचा शिकार बनला.

महत्त्वाच्या बातम्या