विराट-रोहितचा दबदबा कायम; विराट नंबर वन वर तर रोहित.

रोहित शर्मा

दुबई : भारताचा कर्णधार विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) एकदिवसीय क्रमवारीतील फलंदाजांच्या यादीत आपले अव्वल स्थान राखले आहे. तसेच बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या क्रमवारीनुसार, भारताचा उपकर्णधार रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर कायम होता. कोहलीने आपले अखेरचे एकदिवसीय सामने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळले आणि अखेरच्या दोन सामन्यांत ८९ व ६३ धावांची खेळी केली होती.

त्यामुळे त्याने अव्वल स्थान राखले असून त्याच्या खात्यात ८७० गुण आहेत. भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा नुकताच पार पडला. या दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेत रोहित शर्मा खेळू शकला नव्हता. त्याने त्याचा अखेरचा एकदिवसीय सामना जानेवारी २०२० मध्ये खेळला होता. मात्र, असे असतानाही त्याने दुसरे स्थान कायम राखले असून त्याचे ८४२ गुण आहेत.

गोलंदाजांमध्ये यॉर्कर किंग जसप्रीत बुमराहला तिसरं स्थान कायम राखण्यास यश आले आहे. या रॅकिंगमध्ये टीम इंडियाचा ऑलराऊंडर रवींद्र जाडेजाला एका स्थानाचं नुकसान झालं आहे. जाडेजाची आठव्या क्रमांकावरुन सातव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. जाडेजाच्या नावावर एकूण 253 रेटिंग्स पॉईंट्स आहेत. अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमावारीत बांगलादेशचा शाकिब अल हसन पहिल्या क्रमांकावर कायम आहे

अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत बांगलादेशचा शाकिब अल हसन पहिल्या क्रमांकावर आहे. शाकिबच्या नावावर 420 रेटिंग्स पॉईंट्स आहेत. आयसीसीने शाकिबवर नियमाचं उल्लंघन केल्याप्रकरणी 1 वर्ष निलंबनात्मक कारवाई केली होती. यानंतर शाकिबने वेस्टइंडिज विरोधातील तिसऱ्या वनडेमधून पुनरागमन केलं. त्याने या सामन्यात शानदार अर्धशतकी खेळी केली. या खेळीसह तो एका संघाकडून 300 विकेट्स आणि 6 हजार (तिन्ही फॉर्मेटमध्ये ) धावा करणारा एकमेव खेळाडू ठरला.

महत्वाच्या बातम्या