विराटने ‘या’ तीन अडचणींमुळे सोडले कर्णधारपद 

नवी दिल्ली : गुरुवारी विराट कोहलीने एक मोठी घोषणा केली आणि भारताच्या टी -20 संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. सोशल मीडियावर  पोस्ट शेअर करत  होती. त्याच्या या निर्णयावर प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. विराटच्या या निर्णयानंतर क्रिकेट क्षेत्रात एकच खळबळ उडाली. विराटने हा निर्णय अचानक घेण्यामागचे कारण काय? विराटला का कर्णधारपद सोडावे लागले असे प्रश्न देखील सर्वत्र उपस्थित होऊ लागले.

मात्र, कोहली पुढील महिन्यात होणाऱ्या टी 20 विश्वचषक 2021 मध्ये टीम इंडियाचा कर्णधार राहील, परंतु त्यानंतर तो टी -20 फॉरमॅटमध्ये कर्णधार राहणार नाही. फक्त फलंदाज म्हणून टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळत राहील. याशिवाय तो एकदिवसीय आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नियमित कर्णधार असणार आहे.

विराटला हा निर्णय, या तीन कारणांमुळे घ्यावा लागला ते म्हणजे, विराट कोहली गेल्या नऊ वर्षांपासून इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर म्हणजेच आरसीबीचे कर्णधारपद सांभाळत आहे, पण एकदाही संघाला जेतेपद मिळवून देऊ शकला नाही. अशा स्थितीत पुढील महिन्यात पुन्हा आयपीएल फायनल खेळली जाईल आणि जर तो संघाला जिंकू शकला नाही, तर त्याच्या कर्णधारपदाच्या शैलीवर प्रश्नचिन्ह उभे राहण्याची खात्री आहे.

आयपीएल 2021 च्या अंतिम सामन्यानंतर, भारतीय संघाला टी -20 विश्वचषकात सहभागी व्हायचे आहे आणि पहिलाच सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान सोबत खेळायचा आहे. दरम्यान कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ यापूर्वीच 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पाकिस्तानकडून हरला आहे. भारताने एकदिवसीय विश्वचषक 2019 मध्ये पाकिस्तानला वाईट रीतीने पराभूत केले असले तरी देखील यावेळी जर पुन्हा पराभवाला सामोरे जावे लागले तर त्याचे कर्णधारपद अडचणीत आले असते. हेच कारण होते की त्याने केवळ टी -20 विश्वचषकापूर्वीच कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली नाही तर आयपीएल 2021 च्या पूर्वीही त्याने ही घोषणा केली.

याशिवाय, आयसीसी ट्रॉफी जिंकण्यावरही विराटवर दबाव असणार आहे. कारण त्याच्या नेतृत्वाखाली भारताने 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना, एकदिवसीय विश्वचषक 2019 चा उपांत्य आणि विश्व कसोटीचा अंतिम सामना गमावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या :