विराटने सावरलं पण, टीम इंडिया गडबडली

टीम महाराष्ट्र देशा : विराट कोहलीचं खणखणीत शतक हे आजच्या दिवसाच्या पहिल्या सत्राचं वैशिष्ट्य ठरलं. मात्र, विराट कोहलीच्या शतकी खेळीनंतरही पर्थ कसोटीत टीम इंडियाची पहिल्या डावात सात बाद 252 अशी बिकट अवस्था झाली आहे. टीम इंडिया पहिल्या डावाच्या आघाडीपासून अजूनही 74 धावा दूर आहे. विराटनं कसोटी कारकीर्दीतलं आपलं 25 वे शतक जडले. विराटने 257 चेंडूत 13 चौकार आणि एका षटकारासह 123 धावांची खेळी उभारली. पण, योग्य साथ न मिळाल्यानं टीम इंडियाचा डाव कालच्या तीन बाद 172 वरुन सात बाद 257 असा गडगडला. तिसऱ्या दिवशी उपाहाराला खेळ थांबला तेव्हा रिषभ पंत 14 धावांवर खेळत होता.

कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांच्या जबाबदार फलंदाजीने पर्थ कसोटीत टीम इंडियाला दुसऱ्या दिवसअखेर तीन बाद 172 धावांची मजल मारुन दिली होती. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला, त्यावेळी विराट 82 धावांवर तर रहाणे 51 धावांवर खेळत होता. त्या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 90 धावांची अभेद्य भागीदारी रचली होती. कोहली – रहाणेच्या भागीदारीने टीम इंडियाला सावरलं खरं पण, ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूडने टीम इंडियाची दोन बाद आठ अशी दाणादाण उडवली होती. विराटने चेतेश्वर पुजाराच्या साथीने भारताच्या डावाला स्थैर्य दिलं व पुजाराच्या साथीने 74 धावांची भागीदारी रचली. पुजाराने 103 चेंडूंत 24 धावांची खेळी उभारली होती. त्याआधी, ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 326 धावांमध्ये आटोपला. भारताच्या ईशांत शर्मा, जसप्रीत बुमरा आणि उमेश यादवने आजच्या पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियन फलंदाजांवर वर्चस्व गाजवलं. त्यामुळे कांगारुंना कालच्या धावसंख्येत केवळ 49 धावांचीच भर घालता आली. ईशांतने सर्वाधिक म्हणजे चार फलंदाजांना माघारी पाठवले . तर बुमरा, उमेश यादव आणि हनुमा विहारीने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

भारताच्या पराभवाला प्रशिक्षकचं जबाबदार, हरभजनची शास्त्रींवर शेलक्या शब्दात टीका

1 Comment

Click here to post a comment