‘हा दिवस कधीही विसरणार नाही’, २६/११/ दहशतवादी हल्ल्यात झालेल्या शहीदांना विराटने वाहिली श्रद्धांजली

‘हा दिवस कधीही विसरणार नाही’, २६/११/ दहशतवादी हल्ल्यात झालेल्या शहीदांना विराटने वाहिली श्रद्धांजली

virat kohli

मुंबई : मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यावेळी (26-11 Mumbai terrorist attack) नागरिकांचे रक्षण करताना शहिद झालेल्या मुंबई पोलिस, एनएसजी, गृहरक्षक तसेच अन्य सुरक्षा दलातील अधिकारी, जवानांच्या शौर्य व त्यागाचे स्मरण करत अनेकांनी आदरांजली वाहिली आहे.

याच दिवशी पाकिस्तानातून (Pakistan) आलेल्या 10 दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये अनेक लोकांनी आपला जीव गमवला. या मन हेलावणाऱ्या घटनेला आज 13 वर्ष पूर्ण होत आहेत.

२६/११/ हा दिवस  राज्यभर काळा दिवस म्हणून पळाला जातो. आजच्या दिवशी सर्वच स्तरातून ट्विट करत शहिदांना आदरांजली वाहिली दिली जात आहे. मुंबईच्या नव्हे तर देशाच्या काळजावर २६/११/२००८ रोजी दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात आपल्या प्राणांची आहुती देणारे जवान, मुंबई पोलिस व निष्पाप नागरीक यांचे स्मरण करत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने देखील श्रद्धांजली वाहिली आहे.

‘आम्ही हा दिवस कधीच विसरणार नाही, गमावलेले जीवन आम्ही कधीही विसरणार नाही. ज्यांनी आपले प्रियजन गमावले त्या मित्रांना आणि कुटुंबियांना माझ्या प्रार्थना पाठवत आहे,’ असे ट्विट विराटने केले आहे.