विराट कोहलीचं वन डे कर्णधारपदही धोक्यात?

virat

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू व संघाचा कर्णधार विराट कोहली आगामी टी 20 विश्वचषक स्पर्धेनंतर भारताच्या टी 20 कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. विश्वचषक स्पर्धेनंतर टीम इंडियाचे टी 20 कर्णधारपद सोडणार असल्याची चर्चा सुरु होती. अखेर या चर्चेवर पडदा पडला आहे. विराट कोहलीने ट्विटरवरून टी 20 विश्वचषक स्पर्धेनंतर T20 टीमचे कर्णधारपद सोडणार असल्याची माहिती दिली.

विराट कोहलीने T20 विश्वचषक स्पर्धा तोंडावर आलेली असताना कर्णधारपद सोडत असल्याचं जाहीर केलं आणि क्रिकेट जगतात खळबळ उडाली. विराटने स्वतःला थोडी स्पेस देऊ इच्छित असल्याचं सांगत T20 टीमचं कर्णधारपद सोडणार असल्याचं स्पष्ट केलं.

विराटने बॅटिंगमधला फॉर्म मिळविण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं म्हंटल जातंय, पण त्याला एकदिवसीय फॉरमॅटमध्येही असाच निर्णय घ्यायला लागू शकतो, अशी शक्यता आहे. कोहलीने म्हटलं आहे की, तो कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये कर्णधार राहील पण 2023 च्या विश्वचषकात तो भारताच्या एकदिवसीय संघाचे नेतृत्व करेल, पण सध्या तरी याची खात्री कुणीही देऊ शकत नाही.

बीसीसीआयच्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, ‘विराटला माहित होत की जर संघाने युएईमध्ये होणाऱ्या टी -20 विश्वचषकात चांगली कामगिरी केली नाही तर त्याला मर्यादित षटकांच्या कर्णधारपदावरुन काढलं जाऊ शकतं. मर्यादित षटकांच्या कर्णधारपदावरुन बाजूला होऊन त्याने चांगलंच केलं आहे कारण त्याने स्वत:वरचा दबाव कमी करुन घेतला आहे. जर टी -20 मध्ये उत्तम कामगिरी करण्यात अपयश आलं तर त्याचा परिणाम एकदिवसीय फॉरमॅटच्या कॅप्टन्सीवर होऊ शकतो..”

‘नजीकच्या भविष्यात बीसीसीआयने कोहलीकडून एकदिवसीय कर्णधारपद काढून घेतल्यास आश्चर्य वाटायला नको . विराटसेनेला जर टी-20 विश्वचषक ट्रॉफी जिंकण्यात अपयश आलं तर कोहलीला एकदिवसीय क्रिकेटमध्ये फक्त फलंदाज म्हणून खेळायला लागू शकतं’ असं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. आता कोहलीची एकदिवसीय कॅप्टन्सी टी-20 विश्वचषकावर अवलंबून आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

महत्त्वाच्या बातम्या