विराटचे दमदार शतक! एकदिवसीय क्रिकेटमधील ३४वे शतक

विराट कोहली

केप टाऊन : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये विराट कोहलीनं दमदार शतक ठोकलं आहे. विराट कोहलीच्या शतकामुळे भारत मजबूत स्थितीत पोहोचला आहे.

विराटचे या मालिकेतील हे दुसरे तर एकदिवसीय क्रिकेटमधील ३४ शतक ठरले. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यावर भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. रोहित शर्मा पहिल्याच षटकात माघारी परतला. मात्र तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या विराटने शिखर धवनच्या साथीने भारताचा डाव सावरला. त्याने धवनसोबत दुसऱ्या विकेटसाठी १४० धावांची भागीदारी केली. त्यानंतर इतर फलंदाजांसह छोट्या भागीदाऱ्या रचत भारतीय संघाला समाधानकारक धावसंख्या उभारून दिली.