श्रीलंका दौरा: भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला

आज भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना असून भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. हा सामना गॅले येथे होत असून भारतीय संघाचं नेतृत्व विराट कोहली करत आहे.

भारत १९८४ ते २०१५ या काळात श्रीलंकेत २१ कसोटी सामने खेळला असून त्यात ६ विजय भारताने तर ७ विजय श्रीलंकेने मिळवले आहेत. ८ सामन्यांत कोणताही निकाल लागू शकला नाही.

भारताच्या रविचंद्रन अश्विनचा हा ५० वा कसोटी सामना असून चेतेश्वर पुजाराचा ४९ वा कसोटी सामना आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या या सामन्यात कसोटी पदार्पण करत असून तो भारताचा २८९ वा कसोटी खेळणारा खेळाडू आहे.