मुंबई : इंग्लंडमधील लीसेस्टरशायरविरुद्ध भारतीय संघाच्या सराव सामन्यात दिग्गज फलंदाजांनी निराशा केली. रोहित शर्मा आणि शुबमन गिलसारखे फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर विराट कोहलीने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. कोहली चांगल्या फॉर्मात दिसला आणि त्याने काही उत्कृष्ट शॉट्सही खेळले. मात्र, तो पायचीत बाद झाला. विराट पंचांच्या निर्णयावर नाराज होता.
रवींद्र जडेजासोबत पाचव्या विकेटसाठी २६ आणि केएस भरतसोबत सहाव्या विकेटसाठी ५७ धावांची भागीदारी करणारा कोहली अर्धशतक करण्याच्या मूडमध्ये दिसत होता, मात्र रोमन वॉकरने त्याला आपला शिकार बनवले. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, आऊट दिल्यानंतर कोहली अंपायरला काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करत होता आणि मैदान सोडण्यापूर्वी त्याने अंपायरशी संवादही केला होता.
☝️ | Kohli (33) lbw Walker.@RomanWalker17 strikes again! This time he hits the pads of Kohli, and after a long wait the umpire's finger goes up.
Out or not out? 🤔
🇮🇳 IND 138/6
𝐋𝐈𝐕𝐄 𝐒𝐓𝐑𝐄𝐀𝐌: https://t.co/adbXpwig48 👈
🦊 #IndiaTourMatch | #LEIvIND pic.twitter.com/iE9DNCUwLO
— Leicestershire Foxes 🏏 (@leicsccc) June 23, 2022
प्रसिध कृष्णा आणि जसप्रीत बुमराह सराव सामन्यात लीसेस्टरशायरच्या गोलंदाजीचा भाग आहेत. मात्र, दोन्ही वेगवान गोलंदाज छाप पाडू शकले नाहीत. कृष्णाला एक विकेट मिळाली आहे, तर बुमराहला एकही विकेट घेता आलेली नाही. कोहलीने ६९ चेंडूंत ४ चौकार आणि एका षटकारासह ३३ धावा केल्या. कोहलीने डावाच्या ३८व्या षटकात कृष्णाच्या चेंडूवर षटकार मारला होता. पहिल्या दिवशी फक्त ६०.२ षटके खेळली गेली ज्यात भारताने २४६/८ धावा केल्या. भारताकडून केएस भरतने आतापर्यंत सर्वाधिक नाबाद ७० धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –