रनमशीन’ विराट कोहली कसोटी क्रमवारीत अव्वलस्थानी

टीम महाराष्ट्र् देशा : ‘रनमशीन’ आणि टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं आणखी एक विक्रम नावावर केला आहे. विराटनं इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत दोन्ही डावांत २०० धावा केल्या. या कामगिरीच्या जोरावर त्यानं आयसीसीच्या जागतिक कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानी झेप घेतली.

बॉल टॅम्परिंगप्रकरणामुळे मैदानाबाहेर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथला कोहलीने मागे टाकत अव्वल स्थान पटकावलं. कोहलीने आयसीसी क्रमवारीत 934 गुण पटकावत अव्वल स्थानावर कब्जा केला आहे. तर स्टिव्ह स्मिथचे 929 गुण आहेत. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर इंग्लंडचा जो रुट असून त्याचे 865 गुण आहेत.

स्मिथला मागे टाकून कसोटी क्रमवारीत अव्वलस्थान पटकावणारा विराट कोहली हा 2011 नंतरचा पहिलाच भारतीय फलंदाज आहे. त्याआधी 2011 साली सचिन तेंडुलकर कसोटी क्रमवारीत अव्वलस्थानी होता. विराटपूर्वी केवळ सचिन तेंडुलकर, गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग, राहुल द्रविड, सुनील गावसकर आणि दिलीप वेंगसरकर यांनाच कसोटी क्रमवारील अव्वलस्थान पटकावण्याची किमया साधता आली होती.

Rohan Deshmukh

मुलीनां आपल्या प्रियकरामध्ये हवेच असतात हे गुण.

आरक्षण आंदोलनात आगीत तेल ओतण्याचे काम कोणी करू नये : नितीन गडकरी

Latur Advt
You might also like
Comments
Loading...