विराट कोहली कर्णधारपद सोडणार; थोड्याचवेळा पूर्वी केली मोठी घोषणा

विराट कोहली कर्णधारपद सोडणार; थोड्याचवेळा पूर्वी केली मोठी घोषणा

virat kohli

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू व संघाचा कर्णधार विराट कोहली आगामी टी 20 विश्वचषक स्पर्धेनंतर टीम इंडियाचे कर्णधारपद सोडणार असल्याची चर्चा सुरु होती. अखेर या चर्चेवर पडदा पडला आहे. विराट कोहलीने ट्विटरवरून टी 20 विश्वचषक स्पर्धेनंतर कर्णधारपद सोडणार असल्याची माहिती दिली आहे.

विराट कोहलीने ट्विटरवर प्रसिद्ध केलेल्या आपल्या निवेदनात लिहिले आहे की, मला केवळ भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली नाही, तर भारतीय क्रिकेट संघाचे माझ्या क्षमतेनुसार नेतृत्व करण्याची संधी मिळाली. टीम इंडियाचा कर्णधार म्हणून माझ्या प्रवासात मला पाठिंबा देणाऱ्या सर्व लोकांचे मी आभार मानतो. हे सर्व माझ्या सहकारी खेळाडू, सहाय्यक कर्मचारी, निवड समिती, माझे प्रशिक्षक आणि प्रत्येक भारतीय ज्यांनी प्रत्येक सामन्यात आमच्या विजयासाठी प्रार्थना केल्याशिवाय हे शक्य नव्हते.

कामाचा ताण हा महत्त्वाचा भाग आहे आणि मागील ८-९ वर्षांपासून तीनही फॉरमॅटमध्ये वर्कलोड वाढला आहे आणि ५-६ वर्षांपासून मी नेतृत्वाची जबाबदारीही सांभाळत आहे. त्यामुळे मला आता स्वतःला थोडा वेळ द्यायला हवा, जेणेकरून मी वन डे व कसोटी संघाचे नेतृत्व समर्थपणे पेलू शकेन.

टी 20 मध्ये मी टीम इंडियासाठी सर्वोत्तम दिले आणि पुढेही फलंदाज म्हणून योगदान देत राहीन. रवी भाई, रोहित आणि जवळच्या प्रत्येक व्यक्तीशी मी चर्चा केली. त्यानंतरच मी हा निर्णय घेतला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर मी कर्णधारपदावरून पायउतार होणार आहे. याबाबत मी सचिव जय शाह व अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याशीही चर्चा केली आहे. असे मत विराटने त्याच्या निवेदनात मांडले आहे.

महत्त्वाच्या बातम्या