सलग दुसरे द्विशतक ठोकत ‘विराट’ बनला 6 द्विशतक करणारा जगातील पहिलाच कर्णधार

टीम महाराष्ट्र देशा: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने नागपूरमध्ये असलेला फॉर्म राखत दिल्लीच्या फिरजशहा कोटला मैदानात श्रीलंकेविरुद्ध सलग दुसरे द्विशतक झळकावलंय. कोहलीचे यंदाचा वर्षातील हे तिसरे तर कसोटीमधील सहावं द्विशतक आहे.

भारतीय संघात सर्वाधिक द्विशतक करणाऱ्या सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवागसोबत आता कोहलीही पहिल्या स्थानावर पोहचला आहे. तर कर्णधार म्हणून द्विशतकीय खेळी खेळणारा तो जगातील पहिलाच कर्णधार बनला आहे. याआधी कर्णधार म्हणून ब्रायन लाराच्या 5, ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार सर डॉन ब्रॅडमन 4, मायकल क्लार्क 4 आणि ग्रॅमी स्मीथच्या नावावर 4 द्विशतक आहे.

You might also like
Comments
Loading...