कसोटी क्रमवारीत विराटची घसरण…

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियाचा कर्णधार विराटने दोन्ही डावांमध्ये मिळून केवळ 40 धावा केल्याने कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत त्याची तिसऱ्या स्थानावरून चौथ्या स्थानावर घसरण झाली.
विराटच्या खात्यात 847 गुण असून, पहिल्या स्थानावरच्या स्टीव्ह स्मिथच्या खात्यात 936 गुण आहेत. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने 869 गुणांसह चौथ्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. विल्यमसनने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या डनेडिन कसोटीत शतक ठोकले आहे.
तर दुसरीकडे आयसीसीच्या कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत भारताचे रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जाडेजा अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत. आयसीसीच्या कसोटी अष्टपैलूंच्या क्रमवारीत रवीचंद्रन अश्विननं आपलं अव्वल स्थान कायम राखले आहे.