‘द ग्रेट खली’ सोबत ‘विराट’ भेट. . .

वेबटीम : कोहलीने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून रविवारी रात्री WWE स्टार ‘द ग्रेट खली’सोबतचा फोटो शेअर केला आहे. भारतीय क्रिकेट क्रिकेट संघाच्या युवा कर्णधाराचा खली सोबतचा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे.
श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाने काल कोलंबो कसोटीत विजय मिळवला होता. त्यानंतर भारतीय संघ विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी ज्या हॉटेलमध्ये गेला होता त्या ठिकाणी खलीही आला होता. त्यावेळी विराटला खलीसोबत फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. कोहलीने खलीसोबत दोन फोटो काढले आहेत. यापैकी उभे राहून काढलेल्या फोटोत विराट कोहली खलीला पाहुन भारावला गेला असल्याचे स्पष्टपणे दिसत आहेत.


हा माझ्यासाठी खास अनुभव होता. तो एक चांगला खेळाडू आहे, असा संदेशही कोहलीने ट्विटमध्ये लिहला आहे.

bagdure

You might also like
Comments
Loading...