विराट कोहली यंदाच्या पॉली-उम्रीगर पुरस्काराचा मानकरी

टीम महाराष्ट्र देशा : भारताच्या क्रिकेट संघांचा कर्णधार विराट कोहलीला यावर्षीचा उम्रीगर पुरस्कार देण्यात येणार आहे. विराट कोहली याने २०१६-१७,२०१७-१८ या वर्षात फलंदाजी मध्ये जोरदार प्रदर्शन केल आहे. यामुळे विराटची ह्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे यादरम्यान आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक पातळीवर चांगली कामगिरी करणाऱ्या अन्य खेळाडूंनाही गौरवण्यात येणार आहे.

पॉली-उम्रीगर हा पुरस्कार आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये सर्वोत्तम प्रदर्शन करणाऱ्या भारतीय खेळाडूला देण्यात दरवर्षी देण्यात येतो.विराट कोहली याने हा पुरस्कार आपल्या सर्वोत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर चौथ्यांदा पटकाविला आहे.या पुरस्कारासाठीची रक्कम १ लाख रुपयांवरून वाढविण्यात येणार असल्याचे सांगितलं जात आहे.