ते ट्विट कोहलीने हटवले

 विराट कोहली किती संकुचित मनोवृत्तीचा आहे याचं एक उत्तम उदाहरण समोर आलं आहे. विराट कोहलीने कुंबळेची प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर शुभेच्छा देणारे ट्विट हटविल्याचे स्पष्ट झाल्याने  कोहलीच्या संकुचित मनोवृत्तीची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.
  २३ जून २०१६ला कुंबळेची भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यावेळी कर्णधार विराट कोहलीने या निर्णयाचे स्वागत करताना कुंबळेला शुभेच्छा दिल्या होत्या आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ उत्तम वाटचाल करेल अशी अपेक्षा व्यक्त केली होती.विराटने आता हे ट्विट हटविल्याचे कळते आहे. नुकताच कोहलीशी झालेल्या मतभेदांनंतर कुंबळेने प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आणि त्याच पार्श्वभूमीवर कोहलीने शुभेच्छा देणारे वर्षभरापूर्वीचे ते ट्विट रद्द केले आहे.
२३ जून २०१६ला कुंबळेची भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यावेळी कर्णधार विराटने या निर्णयाचे स्वागत करताना कुंबळेला शुभेच्छा दिल्या होत्या आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ उत्तम वाटचाल करेल अशी अपेक्षा व्यक्त केली होती.
  कुंबळेची प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर त्याला वर्षभराचा कालावधी देण्यात आला होता. मात्र कोहलीबरोबर झालेल्या मतभेदानंतर कुंबळेने राजीनामा देत आपल्या प्रशिक्षक पदाच्या कारकिर्दीला पूर्णविराम दिला.
 कुंबळेच्या राजीनाम्यावरून सध्या कोहली माजी खेळाडूंच्या टीकेचा धनी बनला आहे.सातत्याने होणाऱ्या टीकेमुळे कोहलीचा ‘इगो’ दुखावला गेल्याने त्याने हे ट्विट हटवले असल्याची चर्चा आहे.मात्र त्याच्या या कृतीतून टीम इंडियाचा कर्णधार किती संकुचित मनोवृत्तीचा आहे हे अधोरेखित झालं आहे