मुंबई : इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने अचानक एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याने २०११ मध्ये आयर्लंडविरुद्ध आपल्या एकदिवसीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. इंग्लंड कसोटी संघाचा कर्णधार स्टोक्सने सांगितले की, त्याच्या व्यस्त वेळापत्रकामुळे ही घोषणा करण्यात आली आहे. त्याच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर सोशल मीडियावर त्याचे चाहते आणि सहकारी खेळाडूंच्या प्रतिक्रियांचा पूर आला आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीनेही बेन स्टोक्सच्या निवृत्तीबाबत प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, “तुम्ही माझ्याविरुद्ध खेळलेले सर्वात प्रतिस्पर्धी खेळाडू आहात, आदर “. अशा शब्दांत विराटने प्रतिक्रिया दिली आहे.
बेन स्टोक्स आता इंग्लंडसाठी टी-२० आणि कसोटी क्रिकेट खेळत राहणार आहे. तो मंगळवारी (19 जुलै) शेवटचा एकदिवसीय सामना त्याचं घरच मैदान डरहमवर खेळणार आहे. इंग्लंडचा संघ हा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. स्टोक्सने इंग्लंडसाठी १०४ एकदिवसीय सामने खेळले आहेत. २०१९ च्या एकदिवसीय विश्वचषक फायनलमध्ये त्याला सामनावीर म्हणूनही गौरविण्यात आले होते.
स्टोक्सची एकदिवसीय कारकीर्द
स्टोक्सने वयाच्या २० व्या वर्षी २०११ मध्ये आयर्लंडविरुद्ध इंग्लंडकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने ११ वर्षांच्या एकदिवसीय कारकिर्दीत केवळ १०४ सामने खेळले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने ४० च्या सरासरीने २९१९ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या नावावर ३ शतके आणि २१ अर्धशतके आहेत. त्याचबरोबर या अष्टपैलू खेळाडूने ७४ बळीही घेतले आहेत.
इंग्लंडला पहिला एकदिवसीय विश्वचषक जिंकण्यात स्टोक्सचा मोलाचा वाटा
बेन स्टोक्सने २०१९ मध्ये इंग्लंडला एकदिवसीय विश्वचषक विजेता बनवले होते. स्टोक्सने संपूर्ण स्पर्धेत चांगली फलंदाजी करत ६६.४२ च्या सरासरीने ४६५ धावा केल्या होत्या. अंतिम फेरीतही स्टोक्सने ८४ धावांची धडाकेबाज खेळी खेळली होती. त्याच्या या खेळीमुळे इंग्लंडला प्रथमच विश्वचषक जिंकण्यात यश आले. याशिवाय स्टोक्सने या स्पर्धेत ७ बळीही घेतले होते.
महत्वाच्या बातम्या :
- Ben Stokes : मोठी बातमी! इंग्लंडचा स्टार ऑलराऊंडर खेळाडू बेन स्टोक्स वनडे क्रिकेटमधून निवृत्त
- koffee With Karan : करण जोहरची फी ऐकून तुम्हालाही बसेल धक्का; सुपरस्टार अभिनेत्यापेक्षा जास्त मानधन
- Eknath Shinde : एकनाथ शिंदेंची मुख्य नेतेपदी निवड, तर दीपक केसरकर प्रवक्ते; नवीन कार्यकारणी जाहीर
- Tejashwi Yadav : तेजस्वी यादवचं क्रिकेट प्रेम! पंतप्रधान मोदींनी दिला होता वजन कमी करण्याचा सल्ला; पाहा VIDEO!
- Urfi Javed | पहा उर्फी जावेद हिची ‘रिस्की फॅशन’; फ्रंट ओपन टॉप पाहून चाहते शॉक
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<