VIDEO : ‘विरुष्का’च्या लग्नाचे खास क्षण

टीम महाराष्ट्र देशा: संपूर्ण क्रिकेट आणि सिनेरसिकांचे लक्ष लागून राहिलेल्या भारताचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा विवाह सोहळा पार पडला आहे. इटलीच्या मिलान शहरात दोघांचा विवाह झाला.

क्रिकेट आणि बॉलिवूडचं नातं तस खूप घट्ट आहे याचे अनेक उदाहरण याआधी सुद्धा आपल्या समोर आहेत. पण या संपूर्ण जगाचं लक्ष लागलेल्या जोडीची अर्थात  ‘विरुष्का’ची पहिल्यांदा नजरानजर झाली ती 2013 साली क्लिनिक क्लिअर शाम्पूच्या जाहिरात शूटच्या वेळी आणि त्या नंतर या ‘मोस्ट रोमँटिक कपल’ ची संपूर्ण स्टोरी एखाद्या चित्रपटाला साजेशी ठरत अखेर लग्नाच्या पवित्र बंधनात अडकली.