fbpx

विरुष्काला कदाचित पुन्हा करावे लागणार लग्न !

टीम महाराष्ट्र देशा : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहलीने गतवर्षी 11 डिसेंबरला इटलीमधील टस्कनीमध्ये विवाह केला. विराट आणि अनुष्काच्या नातेवाईकांना ही गोष्ट मीडियातूनच मिळाली. मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार अनुष्का शर्मा  आणि विराट कोहलीला पुन्हा लग्न करण्याची गरज लागू शकते. कारण ज्यावेळी तुम्ही दुसऱ्या देशात जाऊन लग्न करता त्यावेळी तिथल्या भारतीय दूतावासाला याबाबतची सूचना द्यावी लागते. अनुष्का आणि विराटने दिली नव्हती. त्यामुळे त्यांना लग्नाची नोंदणी करण्यात अडथळा येऊ शकतो.

Lovebirds Anushka Sharma, Virat Kohliएखादी भारतीय व्यक्ती जेव्हा परदेशात जाऊन लग्न करते, त्यावेळी नियमानुसार त्याची नोंदणी करावी लागते. १९६९च्या कायद्याअंतर्गत ही नोंदणी करणे अनिवार्य आहे. मात्र विराट आणि अनुष्काने ही नोंदणी केलेली नाही. त्यांना ज्या राज्यात आपल्या विवाहाची नोंदणी करायची असेल तर त्यांना तिथल्या नियमानुसार पुन्हा विवाह करावा लागणार असल्याचे कळतेय. पंजाब आणि हरियाणाच्या हायकोर्टाच्या एक वकिलांने माहितीच्या अधिकारातून ही माहिती काढली आहे. त्यामुळे विराट आणि अऩुष्काचे लग्न अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

सध्या विराट दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे तर अनुष्का शाहरुख खानसोबतच्या झिरो चित्रपटाचे शूटिंग तिने  सुरु केले आहे.   २१ डिसेंबरला ‘झिरो’ प्रदर्शित होणार आहे. टिष्ट्वटरवर शाहरूखने ‘झिरो’चा टीजर जारी केला. ‘टिकटें लिए बैठे हैं लोग मेरी जिंदगी की, तमाशा भी पूरा होना चाहिए,’ असे हा टीजर जारी करताना शाहरूखने लिहिले होते. आनंद एल राय या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.

Shahrukh Khan's ZERO Story Revealed - Katrina Kaif - Anushka Sharma

शाहरुख, अनुष्का सोबतच कॅटरिना कैफ देखील या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातील  शाहरूखची  व्यक्तीरेखा ‘गेम आॅफ थ्रोन्स’ या इंग्रजी सीरिजमधील टीरिनयल लेनिस्टर या पात्रावर आधारित असल्याचे सांगितले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, फाॅलो करा टि्वटर आणि जी प्लसवर 

1 Comment

Click here to post a comment