विराट कोहलीला डब्बल दणका मॅचही हरली आणि…

virat kolhi

मुंबई : सुरुवातीला आईपीएल होईल की नाही याबद्दल शंका उपस्थित करण्यात येत होती कारण कोरोनामुळे परिस्थिती बिघडत चालली होती. सामने सुरू असताना प्रेक्षकांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून विनाप्रेक्षक सामने खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला यावर्षी आयपीएल भारतात होत नसून UAE त होत आहे.

अशाच उत्साही वातावरणात दररोज आयपीएलचे सामने पार पडत आहेत. सोशल मीडियावरही याचे उत्साह पाहायला मिळत आहे. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात गुरुवारी पार पडलेल्या पंजाब विरुद्ध बंगळुरूच्या सामन्यात विराट कोहलीला अनेकांच्या रोषाचा सामना करावा लागला. इतकंच नव्हे, तर त्याला याचा फटका आर्थिक स्वरुपातही बसला. सामन्यादरम्यान ‘स्लो ओवर रेट’ साठी त्याला तब्बल १२ लाख रुपयांचा दंड लावण्यात आल्याचं वृत्त एएनआय कडून या संदर्भात माहिती मिळली आहे.

‘बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली याला IPL 2020 मधील पंजाबविरोधातील सामन्यात त्याच्या संघाच्या स्लो ओवर रेटसाठी दंड लावण्यात येत आहे’, अशी माहिती लीगकडून जाहीर करण्यात आलेल्या पत्रकातून देण्यात आली. याअंतर्गत दंडाची रक्कमही स्पष्ट करण्यात आली होती.

याचदरम्यान फिट इंडिया मुव्हमेंटच्या पहिल्या वर्धापनदिनी पंतप्रधानांसोबत झालेल्या चर्चासत्रात विराट कोहली सहभागी झाला होता. यावेळी मोदींनी विराट सोबत बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली. व विराटवर कौतुकाचा वर्षाव केला. याचे ट्विट करून विराट ने आभार मानले होते.

महत्वाच्या बातम्या :-