‘हा’ माजी खेळाडू पुन्हा कोच बनल्यास आनंद होईल : विराट कोहली

टीम महाराष्ट्र देशा : २०१९ च्या वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाचा सेमीफायनलमध्ये पराभव झाला होता. या पराभवाला कोच रवी शास्त्री यांना जबाबदार धरण्यात आले होते. वर्ल्डकपनंतर भारतीय संघ आता वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जात आहे.

या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्री आणि कर्णधार विराट कोहलीने पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. या पत्रकार परिषदेत विराट कोहली याने रवी शास्त्री हे पुन्हा एकदा प्रशिक्षक बनले तर आनंदच होईल असे विधान केले आहे.

 

प्रशिक्षक पदावर बोलताना विराट कोहली कोहली याने सीएसीने (क्रिकेट सल्लागार समिती) या मुद्यावर अद्याप मला विचारणा केलेली नाही. रवी शास्रींसोबत आम्हा सर्वांचा समन्वय चांगला आहे. त्यामुळे जर ते पुन्हा प्रशिक्षक झाले, तर आम्हाला आनंद होईल’, असं विराट म्हणाला. तसेच, ‘याचा निर्णय सीएसीला घ्यायचा आहे’, असंही विराटने सांगितलं.

दरम्यान, बीसीसीआयने संघाच्या प्रशिक्षकांची निवड करण्यासाठी नवीन ‘क्रिकेट सल्लागार समिती (सीएसी)’ स्थापन केली आहे. या समितीत माजी कर्णधार कपील देव, माजी खेळाडू अंशूमन गायकवाड आणि शांथा रंगास्वामी आहेत. हे समिती भारतीय संघाच्या नव्या प्रशिक्षकाची निवड करेल.

जडेजा व धोनी यांच्या खेळीचं कौतुक करावं तितकं कमीच : शोएब अख्तर

रोहित शर्माने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल, सोशल मिडीयावर चर्चांना उधान