अबब ! विराट कोहली घेतो एका ट्विटसाठी ‘एवढे’ पैसे

टीम महाराष्ट्र देशा – अमेरिकेच्या सोशल मीडिया मार्केटिंग फर्म ओपनडोर्सने दिलेल्या रिपोर्टनुसार विराट कोहली एका ट्विटसाठी सर्वाधिक कमाई करणाऱ्या जगातल्या खेळाडूंच्या यादीत पहिल्या पाचमध्ये आहे.

या यादीमध्ये पोर्तुगालचा फूटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो पहिल्या क्रमांकावर आहे. तो एका ट्विटसाठी रोनाल्डो ८,६८,६०४ डॉलर म्हणजेच ६.२४ कोटी रुपये घेतो. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर स्पेनच्या बार्सिलोनाचा फूटबॉलपटू एंड्रेस इनिएस्ता आहे. इनिएस्ता एका ट्विटसाठी ५,९०,८२५ डॉलर म्हणजेच ४.२५ कोटी रुपये कमावतो.

Loading...

तिसऱ्या क्रमांकावर ब्राझीलचा फूटबॉलपटू नेमार आहे. नेमार एका ट्विटसाठी ४,७८,१३८ डॉलर (३.४४ कोटी रुपये) कमावतो. यानंतर चौथ्या क्रमांकावर अमेरिकन बास्केटबॉल खेळाडू लेब्रोन जेम्स आहे. जेम्स एका ट्विटचे ४,७०,३५६ डॉलर (३.३८ कोटी रुपये) घेतो.

तर पाचव्या क्रमांकावर भारताचा कर्णधार विराट कोहलीचं नाव आहे. विराट एका ट्विटसाठी ३,५०,१०१ डॉलर म्हणजे २.५१ कोटी रुपये घेतो. विराट या यादीमधला पहिला क्रिकेटपटू आहे. विराटने काहीच दिवसांपूर्वी इंन्स्टाग्रामवर ५ कोटी फॉलोअर्सचा आकडा पार केला आहे.

हेही पहा –

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोना व्हायरस संदर्भात भारतीय शास्त्रज्ञांना मोठं यश
परभणीच्या 'त्या' शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांनाच केला एसएमएस, त्यांनतर जे घडले...
भारताचा 'हा' स्टार गोलंदाज पोलिसी वर्दीत करतोय कोरोनाबाबत जनजागृती
आनंदवार्ता : पुण्यात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या वाढली, डॉक्टरांवर होतोय कौतुकाचा वर्षाव
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं
अभिनेते ऋषी कपूर यांची मागणी, 'संध्याकाळपुरते तरी दारुची दुकानं उघडा...'
देशातील 10 बँकांचे होणार विलीनीकरण, १ एप्रिलपासून प्रक्रियेला होणार सुरवात
#corona : केवळ लॉकडाऊन पुरेसे नाही, WHOने सुचवला आणखी एक पर्याय
फैसला ऑन दि स्पॉट , संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दादांनी दिला दिलासा