इटलीच्या नृत्यांगना भारतात अब्जोपती होतात तर कोहली देशाचा पैसा बाहेर घेऊन गेला

anushka-sharma-virat-kohli

टीम महाराष्ट्र देशा: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्माने इटलीमध्ये लग्न केला त्यामुळे ते देशभक्त असू शकत नाहीत. तसेच इटलीच्या नृत्यांगना भारतात येऊन अब्जोपती होतात. आणि कोहली देशाचा पैसा बाहेर घेऊन गेल्याच म्हणत भाजपा आमदार पन्ना लाल शाक्या यांनी आकलेचे तारे तोडले आहेत.

शाक्या हे मध्य प्रदेशचे भाजप आमदार आहेत. भाजप आमदाराने इटलीमध्ये लग्न केल्याने थेट विराटच्या देशभक्ती वर शंका उपस्थित केल्याने विरोधीपक्षांकडून टीका केली जात आहे. भगवान राम आणि कृष्ण यांनी भारतामध्ये लग्न केले मात्र भारतात नाव आणि पैसा कमावणाऱ्या विराटने इटलीमध्ये लग्न केले. त्यामुळे तो राष्ट्रभक्त असू शकत नसल्याचही शाक्या म्हणाले.

1 Comment

Click here to post a comment