fbpx

विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटीमधील फलंदाजांच्या क्रमवारीत चौथ्या स्थानी

विराट कोहली

इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेमध्ये विराटने पुन्हा एकदा अफलातून कामगिरी केली आहे. विशाखापट्टणम येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीत विराटने 167 आणि 81 धावा केल्या होत्या. त्याच्या कामगिरीला गोलंदाजांचीही साथ लाभल्याने भारताने या कसोटीत दणदणीत विजय मिळविला. फलंदाजीतील या कामगिरीमुळे विराटच्या क्रमवारीत एकदम 10 स्थानांची सुधारणा झाली. ‘आयसीसी‘च्या क्रमवारीतील गुणांमध्ये 800 चा टप्पा ओलांडणारा कोहली भारताचा अकरावा खेळाडू ठरला आहे.

कसोटीमधील फलंदाजांची क्रमवारी:
1. स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया) : 897 गुण
2. ज्यो रूट (इंग्लंड) : 844 गुण
3. केन विल्यम्सन (न्यूझीलंड) : 838 गुण
4. विराट कोहली (भारत) : 822 गुण
5. हाशिम आमला (दक्षिण आफ्रिका) : 809 गुण
6. युनूस खान (पाकिस्तान) : 790 गुण
7. एबी डिव्हिलर्स (दक्षिण आफ्रिका) : 786 गुण
8. डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया) : 784 गुण
9. चेतेश्‍वर पुजारा (भारत) : 768 गुण
10. ऍलिस्टर कूक (इंग्लंड) : 760 गुण