कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम ‘विराट’च्या नावे!

virat kolhi

दुबई : यंदाच्या मोसमात ख्रिस गेल किंग्ज इलेव्हन पंजाब संघात आहे. मात्र ७ सामने होऊन देखील ख्रिस गेलला खेळवण्यात आलेलं नाही.

पंजाबने आतापर्यंत ७ पैकी ६ सामने गमावले असून चाहते ख्रिस गेलच्या आगमनाची वाट पाहत होते. अखेर काल ख्रिस गेलं सिंघातून खेळताना दिसला आणि पंजाबला विजय देखील मिळवून दिला.

या लढतीत आरसीबीला पराभव सहन करावा लागला असला तरी कर्णधार कोहलीने नवा विक्रम आपल्या नावे केला आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध दहावी धाव घेताच आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराट कोहली याने केला.

याआधी हा विक्रम चेन्नईचा कर्णधार एम.एस. धोनी याच्या नावावर होता. धोनीने आतापर्यंत 4,275 धावा ठोकल्या आहेत. तर तिसऱ्या स्थानावर गौतम गंभीर असून त्याच्या नावावर 3,518 धावा केल्या आहेत. यासह विराटने आणखी एक विक्रम करत इतिहास रचला.

महत्वाच्या बातम्या:-