आरसीबीविरुद्ध घेतलेल्या तीन चुकीच्या निर्णयामुळे विराटने घेतला अंपायरशी पंगा; व्हिडीओ व्हायरल

VIART

अबुधाबी : IPL 2021 च्या एलिमिनेटर मॅचमध्ये शारजाह मैदानावर कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत 20 षटकांत 7 गडी बाद 138 धावा केल्या आणि केकेआरला विजयासाठी 139 धावांचे लक्ष्य दिले.

लकक्षाचा पाठलाग करताना केकेआरने 19.4 षटकांत 6 विकेटवर 139 धावा करत विजयाचे लक्ष्य गाठले आणि सामना चार गडी राखून जिंकला. या विजयासह, केकेआरने पात्रता 2 मध्ये स्थान मिळवले, तर आरसीबीचा प्रवास या पराभवाने संपला. विराट कोहली या हंगामातही आपल्या संघाला जेतेपद मिळवून देण्यात यशस्वी झाला नाही आणि कर्णधार म्हणून हा त्याचा शेवटचा आयपीएल सामना होता ज्यात तो हरला. त्याचबरोबर विराटच्या नेतृत्वाखाली RCB सलग दुसऱ्या सत्रात प्लेऑफमध्ये हरला आणि जेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर पडला.

या सामन्यात आरसीबीचा कर्णधार विराट कोहली अंपायरवर चांगलाच संतापला. केकेआर विरुद्धच्या सामन्यात अंपायर वीरेंद्र शर्मा यांनी तीन चुकीचे निर्णय दिले, यानंतर विराटचा पारा चढला. त्यानंतर वीरेंद्र शर्मा यांनी दिलेल्या नर्णयावर विराटने डीआरएस घेतला आणि त्यांनी दिलेले तिन्ही निर्णय बदलण्यात आले. हे तिन्ही निर्णय एलबीडब्ल्यूचे होते. वीरेंद्र शर्मा यांच्या तिसऱ्या चुकीच्या निर्णयानंतर विराट कोहली त्यांच्याजवळ गेला आणि दोघांमध्ये काहीतरी चर्चा झाली. युझवेंद्र चहलने टाकलेला बॉल राहुल त्रिपाठीच्या पायाला लागला, यानंतर आरसीबीने एलबीडब्ल्यूसाठी अपील केलं.

अंपायर वीरेंद्र शर्मा यांनी हे अपील फेटाळून लावल्यानंतर आरसीबीने डीआरएस घेतला. रिप्लेमध्ये राहुल त्रिपाठी आऊट असल्याचं निष्पन्न झालं. राहुल त्रिपाठी पॅव्हेलियनमध्ये गेल्यानंतर विराट अंपायरसोबत चर्चा करण्यासाठी आला. या सामन्यात तिसऱ्यांदा चुकीचा निर्णय दिला गेल्याचं विराट अंपायरला सांगत असल्याचं त्याच्या हावभावांवरून दिसत होतं. यानंतर विराटने बॉलही आपटला.

अंपायर वीरेंद्र शर्मा यांनी पहिल्या दोन चुका आरसीबी फलंदाजी करत असताना केल्या. शर्मा यांनी शाहबाज अहमद  आणि हर्षल पटेल  यांना एलबीडब्ल्यू आऊट दिलं, पण दोघांच्याही बॅटला बॉल लागला होता. या दोघांनीही डीआरएस घेतला आणि रिप्लेमध्ये नॉट आऊट असल्याचं समोर आलं, त्यामुळे वीरेंद्र शर्मा यांच्यावर निर्णय बदलण्याची नामुष्की ओढावली. या दोन चुकीच्या निर्णयांमुळे आरसीबीला दोन रनचं नुकसान झालं.

महत्वाच्या बातम्या