fbpx

विराट फिट, इंग्लंड दौऱ्यासाठी सज्ज

विराट कोहली

टीम महाराष्ट्र देशा: तंदुरुस्त झालो असून आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी सज्ज झालो आहे. आमचा संघ आता आक्रमणासाठी पूर्णपणे तयार आहे, असा विश्वास भारताचा कर्णधार विराट कोहली याने व्यक्त केला आहे. भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासमवेत इंग्लंड दौऱ्याआधी आयोजित पत्रकार परिषदेत तो बोलत होता.

कोहली यंदाच्या काऊंटी क्रिकेटमध्ये सरे या संघाकडून खेळणार होता. पण आयपीएल दरम्यान कोहलीच्या मानेला दुखापत झाली. त्यामुळे त्याला काऊंटी स्पर्धेला मुकावे लागले. तसेच, अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटीमधून देखील विराटला विश्रांती देण्यात आली होती. ३ जुलैपासून भारताचा इंग्लंड दौरा सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर विराट इंग्लंमध्ये काऊंटी क्रिकेट खेळणार होता, परंतु दुखापतीमुळे त्याला काऊंटी स्पर्धेत सहभागी होता आले नाही.