fbpx

विराट चे शानदार शतक

टीम महाराष्ट्र देशा : अॅॅडलेड येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सुरु असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्या मध्ये कर्णधार विराट कोहलीने संयमी खेळी खेळत आपले शतक पूर्ण केले आहे. हे विराट कोहलीचे एक दिवसीय क्रिकेट मधले ३९ वे शतक आहे. विराट कोहलीच्या या संयमी शतकाने भारतीय संघाला या डावात स्थैर्य मिळाल्याचे दिसून येत आहे.

ऑस्ट्रेलियाने भारतासमोर २९९ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. या लक्ष्याचा पाठलाग करतान शिखर धवन (३२) बाद झाल्यानंतर रोहित शर्मा च्या साथीने कोहलीने डावाला सुरवात केली. सध्या विराट कोहली एम एस धोनीच्या साथीने खेळत आहे तर भारताला सामना जिंकण्यासाठी ४५ चेंडू मध्ये ६५ धावांची गरज आहे.