Share

T20 World Cup | विराटने मोडला तेंडुलकर आणि लाराचा विक्रम, ‘ही’ कामगिरी करणारा ठरला जगातील पहिला क्रिकेटर

टीम महाराष्ट्र देशा: आज टी 20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेमधील दुसरा उपांत्य फेरी सामना भारत (India) आणि इंग्लंड (England) या संघामध्ये ॲडलेड येथे पार पडला. या सामन्यामध्ये नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत इंग्लंड संघाने हा सामना आपल्या नावावर केला. हा सामना जिंकल्यानंतर इंग्लंड संघाने टी 20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम स्पर्धेमध्ये स्थान मिळाले आहे. या सामन्यात भारतीय संघाकडून विराट कोहलीने शानदार अर्धशतक झळकावले आहेत. अर्धशतकाबरोबरच विराटने एक विशेष विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे. विराट कोहलीने या विश्वचषक स्पर्धेमध्ये चार अर्धशतक झळकावले आहेत.

टी 20 विश्वचषक स्पर्धेमध्ये विराट कोहली जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. इंग्लंड विरुद्ध भारत या सामना दरम्यान विराटने 43 धावा करताचं टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या 4000 धावांचा टप्पा पूर्ण केला. ही कामगिरी करणारा विराट हा पहिला खेळाडू ठरला आहे. या सामन्यांमध्ये विराट कोहलीने 40 चेंडू मध्ये 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 50 धावा पूर्ण केल्या.

टी 20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेमध्ये कोहलीने मोडला तेंडुलकरचा रेकॉर्ड

एकदिवसीय आणि टी 20 विश्वचषकमध्ये सामन्यामध्ये भारतासाठी 350 किंवा त्याहून अधिक धावा करणारा विराट कोहली पहिला खेळाडू ठरला आहे. या यादीमध्ये आधी सचिन तेंडुलकरचे नाव होते पण आता विराटने सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे. सचिन तेंडुलकरच्या नावावर या यादीमध्ये 339 धावा आहेत. विराट कोहलीने 2014 टी 20 विश्वचषक सामन्याच्या उपांत्य फेरीमध्ये 72 नाबाद धावा केल्या होत्या. तर याच विश्वचषक सामन्यांमध्ये अंतिम फेरीमध्ये त्याने 77 धावा केल्या होत्या. त्याचबरोबर 2016 टी 20 विश्वचषक स्पर्धेमध्ये विराटने फेरीमध्ये 89 धावा केल्या होत्या.

विराटने ब्रायन लाराला सोडले मागे

ॲडलेड ओव्हलवर सर्वाधिक धावा करणारा विराट कोहली पहिला विदेशी फलंदाज ठरला आहे. या मैदानावर विराटने तीनही फॉरमॅटमध्ये 957 धावा केले आहेत. या ठिकाणी त्याने कसोटीत 509 धावा एक दिवसीय सामन्यांमध्ये 244 धावा आणि टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 204 धावा करून आपली उत्कृष्ट कामगिरी सिद्ध केली आहे. दरम्यान, विराटने 940 आंतरराष्ट्रीय धावा करणारा वेस्टइंडीजचा महान फलंदाज ब्रायन लाराचा विक्रम मोडला आहे.

महत्वाच्या बातम्या 

टीम महाराष्ट्र देशा: आज टी 20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेमधील दुसरा उपांत्य फेरी सामना भारत (India) आणि इंग्लंड (England) …

पुढे वाचा

Cricket Sports

Join WhatsApp

Join Now