fbpx

विरारमध्ये चोर असल्याच्या संशयावरुन विद्यार्थ्यावर अ‍ॅसिडहल्ला

वसई : विरारमधील एका विद्यार्थ्यावर चोर समजून अ‍ॅसिड हल्ला केल्याची घटना घडली आहे. यासंदर्भात राहुल बावस्कर या अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल याला मित्रांनी गरबा खेळायला बोलावले होते. मात्र त्याला खेळायला जायचे नव्हते त्यामुळे तो येथील परिसरात लपून बसला होता. तेव्हा त्याच्यावर अंगावर अचानक पाणी पडले. घरी जावून त्याने बघितले असता त्याच्या अंगावर जखमा झालेल्या दिसल्या. राहुल लपलेल्या गल्लीत पेट्रोल चोरीच्या घटना होत असल्याने चोर समजून असे केल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.