Share

Viral Video | Zomato डिलिव्हरी एजंटचे केले आरती करून स्वागत, पाहा व्हिडिओ

टीम महाराष्ट्र देशा: सोशल मीडियावर दररोज आश्चर्यचकित करणारे व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये कधी फनी तर कधी क्यूट व्हिडिओ बघायला मिळतात. पण सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये आपल्याला काहीतरी वेगळचं दिसत आहे. या व्हिडिओमध्ये डान्स, भांडण याव्यतिरिक्त काहीतरी वेगळी घटना घडताना दिसत आहे.

ऑनलाइन फूड ऑर्डर केल्यानंतर बराच वेळा डिलिव्हरी एजंटला यायला उशीर होतो. त्यामुळे लोक या डिलिव्हरी एजंटना फोन करतात किंवा उशीर झाल्याबद्दल फटकारतात. पावसामुळे किंवा ट्रॅफिक मुळे या डिलिव्हरी एजंटला आपली ऑर्डर पोहोचवायला उशीर होतो. व्हिडिओमध्ये आपल्याला डिलिव्हरी एजंट सोबत एक मजेशीर घटना घडताना दिसत आहे.

डिलिव्हरी एजंट सोबत नक्की काय घडले?

या व्हिडिओमध्ये एक माणूस Zomato डिलिव्हरी एजंटची आतुरतेने वाट बघत असल्याचे दिसत आहे. ट्राफिक मुळे या डिलिव्हरी एजंटला उशीर झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हा माणूस दारात उभे राहून डिलिव्हरी एजंटचे स्वागत करतो. डिलिव्हरी एजंट येतचं तो माणूस ‘आईए आपका इंतजार है’ गाणं म्हणून लागतो. ते गाणं ऐकून डिलिव्हरी एजंट आपले हेल्मेट काढून हसू लागतो. त्यानंतर तो माणूस चक्क डिलिव्हरी एजंटची आरती करून त्याचे स्वागत करतो.

पाहा व्हिडिओ 

व्हायरल व्हिडिओ

हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ sanjeevkuamar220268 या इंस्टाग्राम अकाउंट द्वारे शेअर करण्यात आलेला आहे. या व्हिडिओला त्यांनी कॅप्शन दिले आहे, ” दिल्लीमध्ये एवढे ट्राफिक असतानाही Zomato ने आम्हाला आमची ऑर्डर दिली, धन्यवाद Zomato.” इंस्टाग्रामवरील या रीलला आतापर्यंत 4.9m पेक्षा जास्त व्ह्यूज आणि 430 लाईक्स मिळाले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

टीम महाराष्ट्र देशा: सोशल मीडियावर दररोज आश्चर्यचकित करणारे व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये कधी फनी तर कधी क्यूट व्हिडिओ बघायला …

पुढे वाचा

Marathi News

Join WhatsApp

Join Now