टीम महाराष्ट्र देशा: सोशल मीडियावर आपण दररोज काहीतरी नवनवीन बघत असतो. यामध्ये प्रामुख्याने व्हायरल व्हिडिओचा समावेश असतो. हे व्हायरल व्हिडिओ कधी आपल्याला आश्चर्यचकित करून सोडतात तर कधी हृदयाला स्पर्श करून जातात. या व्हिडिओमध्ये आपल्याला अनेकदा पाळीव प्राण्यांचे तर कधी जंगली प्राण्यांचे व्हिडिओ बघायला मिळतात. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये आपल्याला असाच काहीतरी प्रकार बघायला मिळतो. आपल्या घराच्या सभोवताली खारुताई खेळताना आपण अनेक वेळा पाहिलेले आहे. अन्नाच्या शोधात दिवसभर तर इकडे तिकडे पळत असतात. खारुताई अतिशय चपळ आणि शरीराने एकदम लहान असते त्यामुळे ती कुणालाही पकडता येत नाही. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक छोटीशी खारुताई आपल्याला मिश्किलपणे खाऊ खाताना दिसत आहे.
मिश्किल खारुताई
सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आपल्याला एक खारुताई बघायला मिळत आहे. एक महिला एका वाटीमध्ये खारुताईसाठी खाण्यासाठी घेऊन ते आपल्या घराच्या बाहेरच्या खिडकीवर नेऊन ठेवतो. खारुताई हळूच येऊन त्यातील खाऊ घेऊन पळून जाऊन बाजूला बसून तो खाताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. खारुताईचा हा मिश्किलपणा लोकांना खूप आवडत आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ही महिला महागडे नट्स आणि ड्रायफ्रूट्स घालू ताईला खायला देताना दिसत आहे. ते ड्रायफ्रूट्स आणि नट्स खारुताई हळुवारपणे घेऊन जाऊन बाजूला खाताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
पाहा व्हिडिओ
Viral Video | मिश्किलपणे खाऊ खाताना दिसली 'ही' खारुताई, पाहा व्हिडिओ pic.twitter.com/85ow0w1Nlt
— Maharashtra Desha महाराष्ट्र देशा (@MHD_Press) October 14, 2022
व्हायरल व्हिडिओ
हा व्हिडिओ सोशल मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. चाहत्यांकडून या व्हिडिओला मोठी पसंती मिळत आहे. squirrel__lover इंस्टाग्राम पेज द्वारे हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत 15 लखन पेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले असून या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात लाईक्स देखील मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या
- Asaduddin Owaisi | हिजाब नाही मग बिकिनी घालायची का?; हिजाबवाली महिला PM म्हणून बघायचीय…
- Jayant Patil । “ठाकरेंकडून सत्ता-धनुष्यबाण हिसकावून घेतलं, महाराष्ट्राच्या जनतेला पसंत नाही, उत्तर मिळणारच!”
- Travel Tips | आता करा मोफत फॉरेन ट्रीप, कारण ‘हा’ देश देणार आहे मोफत विमान तिकीट
- Facebook Instant Article | एप्रिल २०२३ ला फेसबुक इस्टंट आर्टिकल बंद होणार
- Nitesh Rane । “उद्धव ठाकरेंना मशाल नाही, आईस्क्रीमचा कोन दिलाय”; नितेश राणे यांचा हल्लाबोल