Share

Viral Video | टीव्ही आणि कम्प्युटर पाण्याने धुणाऱ्या ‘या’ तरुणाचा व्हिडिओ झाला व्हायरल

टीम महाराष्ट्र देशा: सध्या सर्वत्र दिवाळी Diwali ची धूम सुरू असल्यामुळे सगळीकडे साफसफाई चा जोर बघायला मिळत आहे. दिवाळीपूर्वी लोक आपल्या घराची साफसफाई करायला घेतात. दिवाळीमध्ये घराच्या पडद्यापासून ते फरशीपर्यंत प्रत्येक गोष्ट साफ करण्यात येते. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ वेगाने व्हायरल Viral Video होत आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण साफसफाई करताना दिसत आहे, जी पाहून तुमचे डोके चक्रावून जाईल.

आपण अनेकदा गमती गमतीमध्ये असे म्हणतो की, काम अशा पद्धतीने केले पाहिजे की तुम्हाला ते काम पुन्हा कोणी करायला सांगितले पाहिजे नाही. या व्हिडिओ मध्ये दिसणारा व्यक्ती या वाक्याचे पूर्णपणे अनुकरण करण्याचे दिसत आहे. कारण या व्हिडिओमध्ये हा व्यक्ती चक्क पाण्याने इलेक्ट्रॉनिक वस्तूंना धुताना दिसत आहे. होय, या व्हिडिओमध्ये हा व्यक्ती चक्क टीव्ही आणि कम्प्युटर पाण्याचा पाईप लावून धुताना दिसत आहे.

पाण्याने टीव्ही आणि कम्प्युटर धुणारा हा व्यक्ती

सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ बघून वापरतकर्त्यांना आश्चर्याचा धक्का बसलेला आहे. कारण या व्हिडिओमध्ये ही व्यक्ती चक्क पाइपने टीव्ही आणि कम्प्युटर स्क्रीन धुताना दिसत आहे. जे पाहून वापरकर्त्यांचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसत नाही आहे. त्याचबरोबर या व्हिडिओने लोकांना विचार करायला भाग पडला आहे की, त्या व्यक्तीच्या कुटुंबियांची अवस्था काय झाली असेल.

पाहा व्हिडिओ

 Viral Video

इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ @gulzar_sahab या ट्विटर हँडल द्वारे शेअर करण्यात आलेला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत 84 हजारांपेक्षा अधिक व्ह्युज मियाळले आहेत. या मजेदार व्हिडिओला कॅप्शन देण्यात आलेले आहे, ” थोड्यावेळाने हा व्यक्ती माझ्या घरून फ्री होणार आहे, तुम्हाला कोणाला दिवाळीची साफसफाई करायची असेल तर मी स्वतः माझी गाडी घेऊन या व्यक्तीला तुमच्या घरी सोडायला येईल.” हा व्हिडिओ आणि याचे कॅप्शन बघून वापर करताना आपले हसू आवरता येईनासे झाले आहे.

महत्वाच्या बातम्या 

टीम महाराष्ट्र देशा: सध्या सर्वत्र दिवाळी Diwali ची धूम सुरू असल्यामुळे सगळीकडे साफसफाई चा जोर बघायला मिळत आहे. दिवाळीपूर्वी लोक …

पुढे वाचा

Marathi News

Join WhatsApp

Join Now