व्हायरल सत्य : निवडणुकांमध्ये ऑनलाइन पद्धतीने मतदान करता येणार का ?

मुंबई : लोकसभा निवडणूक २०१९ साठी ऑनलाईन मतदानाची कोणतीही सुविधा उपलब्ध नसून अशी सुविधा उपलब्ध असल्याबाबतचा व्हॉट्सॲपवरील संदेश चुकीची माहिती पसरवित आहे, असे स्पष्टीकरण मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केले आहे.

भारतीय पासपोर्ट धारक अनिवासी नागरिक (एनआरआय) आगामी लोकसभा निवडणूक 2019 साठी ऑनलाईनरित्या मतदान करुन शकतील अशा आशयाचा चुकीचा संदेश सोशल मीडियावरुन विशेषत: व्हॉट्सॲपवरुन फिरत आहे. त्याबाबत मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने हे स्पष्टीकरण केले आहे.

Loading...

भारत निवडणूक आयोगाने भारतीय नागरिक तसेच अनिवासी भारतीय नागरिकांसाठी मतदार नोंदणीची ऑनलाईन सुविधा nvsp.in या पोर्टलवर उपलब्ध करुन दिलेली आहे. त्यामुळे अनिवासी नागरिकांनाही ऑनलाईनरित्या मतदार म्हणून नोंदणी करता येणार आहे. परंतु मतदान करण्यासाठी संबंधित अनिवासी भारतीयास त्याचे नाव समाविष्ट असलेल्या मतदारसंघातील मतदान केंद्रावर प्रत्यक्ष येऊनच मतदान करावे लागणार आहे, असेही मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
घ्या आता ! इंदुरीकर म्हणाले, मी असं बोललोच नाही
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
माझ्या भावाची प्रकृती ठणठणीत, काळजी करण्याचे कारण नाही - उदयनराजे भोसले