#व्हायरल : हे सरकार आमचे नसून केवळ शिवसनेचे ! पृथ्वीराज चव्हाणांचे खळबळजनक विधान

Pruthviraj Chavan

मुंबई : माध्यमांमधून एक धक्कादायक वृत्त समोर येत आहे. कॉंग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एका कार्यकर्त्याशी बोलताना हे सरकार आमचे नसून शिवसेनेचे आहे, असे विधान केले आहे. तसेच असे वक्तव्य केल्याची ऑडीओ क्लिप देखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत एकी नसल्याचं दिसत आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून एका कार्यकर्त्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काहीतरी करावे, अशी विनंती केली. त्यावेळी संबंधित कार्यकर्ता व चव्हाण यांच्यात झालेल्या चर्चेची आॅडीओ क्लिप रविवारी ‘व्हायरल’ झाली. यामध्ये चव्हाण म्हणाले की, ‘सरकार आमचं नाही. शिवसेनेचं आहे. तुमच्या अडचणींची मी फक्त शिफारस करू शकतो. यावर कार्यकर्त्याने तुम्हाला भविष्यात मोठी संधी निर्माण होईल, असे विधान केले. यावर चव्हाण म्हणाले, सध्या तरी कोणीही संधी दिलेली नाही.

ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकीकडे आमचं सरकार म्हणत असताना माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेत्यांपैकी एक असणारे पृथ्वीराज चव्हाण मात्र हे सरकार केवळ शिवसेनेचे असल्याचं म्हणत आहेत. यावरून महाविकास आघाडीत एकी नसल्याचं दिसत आहे.

यावर राज्य मंत्री शंभू राजे देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, पृथ्वीराज चव्हाण यांच्या बोलण्याचा विपर्यास करू नये. राज्यातील सरकार महाआघाडीचे आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे, काँग्रेसचा नाही. शिवसेना, राष्ट्रवादी व राष्ट्रीय काँग्रेस या तीन पक्षांच्या सरकारचे नेतृत्त्व शिवसेना करत आहे. तीन पक्ष मिळून आम्ही एकत्र काम करतोय त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानाचा विपर्यास करू नये.

महत्वाच्या बातम्या

#corona : राज्य आणि रेल्वेची जुंपली, CM ठाकरेंच्या आरोपावर गोयलांचे रात्री 2 वाजेपर्यंत ट्विट…

#Corona : परीक्षेसाठी एवढी लुडबूड का ? शिवसेनेने घेतला राज्यपालांचा समाचार

#corona : राज्यात कोरोनाबाधितांनी गाठला 50 हजाराचा आकडा ! 3041 रुग्णांची नव्याने भर