पत्रकाराला नोटबंदीचे फायदे सांगणारी व्हिडीओ क्लिप व्हायरल

notebandi-aur-modi-sarkar

टीम महाराष्ट्र देशा – नोटबंदीला वर्षपूर्ती झाल्यानिमित्त विरोधकांकडून सरकारला टार्गेट केलं जात असताना मोदींनी केलेल्या नोटबंदीचा महिमा सांगणारी एक व्हिडीओ क्लिप सध्या मोठ्याप्रमाणावर व्हायरल होत आहे.या क्लिप मध्ये नोटबंदीमुळे झालेले फायदे अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आल्याने ही क्लिप व्हायरल झाली आहे .

Loading...

आज देशभर विरोधी पक्षांकडून नोटबंदीला वर्षपूर्ती झाल्यानिमित्त विविध प्रकारे सरकारचं नोटबंदीचं पाऊल कसं चुकल हे जनतेच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न सुरु आहे. सोशल मिडीयावर देखील सरकारला जाब विचारला जात आहे मात्र सोशल मिडीयाचा वापर करण्यात पटाईत असणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांकडून नोटबंदीचे फायदे सांगणारी एक व्हिडीओ क्लिप सध्या मोठ्याप्रमाणावर शेअर केली जात आहे .या क्लिपमध्ये एका पत्रकाराला सामान्य माणूस नोट बंदी केल्यामुळे कशाप्रकारे देशाला फायदा झाला हे उपहासात्मकरित्या सांगत आहे .

पहा व्हिडीओ-

2 Comments

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...