विंग कमांडर अभिनंदन यांना स्वातंत्र्यदिनी मिळणार ‘वीर चक्र’

टीम महाराष्ट्र देशा : उद्या भारताचा ७३ वा स्वतंत्रदिन साजरा होत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यासह देशात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशाच दिल्लीतील एका कार्यक्रमात विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना वीर चक्र या सन्मानाने सन्मानित करण्यात येणार आहे. पाकिस्तानविरोधात निकराचा लढा देत दाखवलेल्या साहसाबद्दल त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.

अभिनंदन यांनी पाकिस्तानच्या f-16 या लढाऊ विमानाचा वेध घेत त्यांनी घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला होता. पाकिस्तानच्या बालाकोट मधील दहशतवाद्यांच्या तळावर भारतीय सैन्याने एअर स्ट्राईक केला होता. यावेळी निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अभिनंदन यांनी पाकिस्तानचं F-16 विमान पाडलं होतं. त्यामुळे त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

Loading...

तसेच, या प्रसंगात ते पाकिस्तानात गेले होते त्यामुळे त्यांना कैद करण्यात आले होते. त्यानंतर भारताने टाकलेल्या दबावामुळे अवघ्या ६० तासांत अभिनंदन यांची पाकिस्तानला सुटका करावी लागली. वाघा बॉर्डरमार्गे अभिनंदन भारतभूमीवर परतले होते. त्यानंतर त्यांची मेडिकल चाचणी करण्यात आली होती. तसेच त्यांना मानसिक किंवा शाररीक त्रास देण्यात आला तर नाही ना याचीही चौकशी करण्यात आली होती.

दरम्यान, ‘परम वीर चक्र’, ‘महा वीर चक्र’ यानंतर ‘वीर चक्र’ हे तिसऱ्या क्रमांकाचं शौर्य पदक आहे. हे पदक युद्धावेळी वीरता दाखवणाऱ्या भारतीय सैन्य दलाच्या जवानांना प्रदान केलं जातं. असामान्य साहस किंवा बलिदान देणाऱ्या जवानांना हे मानचिन्ह देण्याची परंपरा आहे. त्यामुळे अभिनंदन यांच्या शौर्याची दाखल घेत सरकारने हा निर्णय घेतला आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
म्हणून नारायण राणे यांचा जळफळाट होतोय, शिवसेनेचा ढाण्या वाघ राणेंवर गरजला
टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
शरद पवार होणार निवृत्त ? पुन्हा राज्यसभेबाबत सस्पेन्स कायम
इंदोरीकर महाराजांच्या 'त्या' वक्तव्यावर सिंधुताई सपकाळांची लक्ष्यवेधी प्रतिक्रिया
फक्त विधानसभा कशाला लोकसभेच्या देखील निवडणुका घ्या, पवारांनी फडणवीसांना ललकारलं
अर्जुन कपूरचा मलायका सोबतच्या नात्याबद्दल बोलतांना मोठा खुलासा ...
चुकीला माफी नाही ! आदित्य ठाकरे यांनी केले दिल्लीतील 'त्या' अधिकाऱ्याला निलंबित
'तृप्ती देसाईंवर अश्लील टीका इंदुरीकरांच्या सूचनेनुसारच' ; तासगावात तक्रार