मराठा क्रांती मोर्चा : मुंबईत आंदोलनाला हिंसक वळण

ठाणे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या मराठा क्रांती मोर्चानं आज मुंबई , ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, अकोला, सातारा बंदची हाक दिली आहे. या आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण प्राप्त झाले आहे. ठाण्यातील वागळे इस्टेट येथे सकाळी आंदोलकांनी टीएमटीच्या बसची तोडफोड केली. शिवाय, तीन हात नाका परिसरात आंदोलकांनी घोषणाबाजी करत मुंबईकडे येणारी वाहतूक रोखून धरल्यानं प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे, माझीवाडा पुलावर आंदोलकांनी टायर जाळून निषेध नोंदवला.

मराठा क्रांती मोर्चा : उद्या मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे बंदची हाक

मराठा आरक्षण : गडहिंग्लज येथे मराठा संघटनांचा रास्ता रोको

मराठा क्रांती मोर्चा : पोलिसाचा हृद्यविकाराच्या झटक्याने मृत्यू

काय आहेत नेमक्या मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या

  • मराठा समाजाला त्वरीत आरक्षण द्यावे.
  • मराठा विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कातील ५० टक्के सवलतीची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांची मान्यता रद्द करा.
  • राज्य सरकारच्या नोकर भरतीत मराठयांसाठी घोषित केलेल्या १६ टक्के आरक्षणाचा सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात अध्यादेश काढून त्यांचे त्वरीत कायद्यात रूपांतरण करावे.
  • आण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतंर्गत कर्ज देण्यासाठी बँकांना सक्तीचे आदेश द्यावेत.
  • मौजे कोपर्डी ता. कर्जत घटनेतील अत्याचार व हत्या करणाऱ्या नराधम आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी.
  • अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमाच्या तरतुदींचा सर्रास होणारा गैरवापर थांबवावा व योग्य ती दुरुस्ती करावी.
  • अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे.
You might also like
Comments
Loading...