धुळ्यात मराठा आंदोलनास हिंसक वळण ; हिना गावित यांच्या वाहनांची तोडफोड

टीम महाराष्ट्र देशा : सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न चागलाचं पेटलाय. मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह आपल्या विविध मागण्यासाठी मराठा समाजाने मागील वर्षी ठिकाणी मूक मोर्च्याचे आयोजन केले होते. मात्र या विराट मोर्च्यांची शासन दरबारी दखल न घेण्यात आल्याने, या पुढे ठोक मोर्च्यांचे आयोजन करण्यात येईल असा इशारा मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीनं देण्यात आला होता.

गेल्या २० दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीनं राज्यभर ठोक मोर्च्याचे आयोजन करण्यात येत आहे. अनेकवेळेला या मोर्च्याला हिंसक वळण देखील लागल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान आज पुन्हा एकदा मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीनं, धुळ्यात केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. यावेळी आक्रमक झालेल्या आदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर खासदार हिना गावित यांच्या वाहनांची तोडफोड केली.

उद्धव ठाकरेंना आरक्षणातील काही कळतं का? : राणे

 

You might also like
Comments
Loading...