हिंसाचाराने ही समस्या सुटणार नाही, नुकसान देशाचंच होईल; राहुल गांधींचं शेतकऱ्यांना आवाहन

rahul gandhi

नवी दिल्ली : दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलनाने हिंसक वळण घेतलं आहे. केंद्राच्या तीन कृषी कायद्यांविरोधात गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ शेतकरी आंदोलन करत आहेत. आज प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देखील हे आंदोलन सुरु असून आज शेतकऱ्यांनी दिल्लीतील सीमांमधून आत येऊन ट्रॅक्टर मोर्चा काढला आहे.

या आंदोलनासाठी पोलिसांनी मार्ग आखून देऊन मर्यादित परवानगी दिली होती. राजपथावरील प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर या आंदोलनाला वेळ देण्यात आली होती. याआधीच हा ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. सुरुवातीला तीन सीमांमधून दिल्लीत प्रवेश करून हा ट्रॅक्टर मोर्चा पुढे चाललेला होता. मात्र शेतकरी अधिक आक्रमक झाले व हा जत्था लाल किल्याकडे जात असताना पोलीस व आंदोलक भिडल्याचं दिसून आलं.

हे आंदोलन आता शेतकरी नेत्यांच्या हाताबाहेर गेल्याचं दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी लाल किल्ला देखील काबीज केल्याचं दिसून येत आहे. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता काही आंदोलकांनी दगडफेक केली, ट्रॅक्टर पोलिसांवर चढवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आखून दिलेला मार्ग सोडून हे आंदोलक इतर भागात जाण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलिस अश्रूधूर, लाठीचार्ज करून परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत.

या हिंसाचारानंतर काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांनी देखील हिंसाचार अयोग्य असल्याचं म्हणलं आहे. काँग्रेससह राहुल गांधी यांनी सुरुवातीपासूनच शेतकरी आंदोलनाला पाठींबा देत कृषी कायद्यांचा विरोध केला होता. मात्र, ‘हिंसाचाराने ही समस्या सुटणार नाही. जखम कोणालाही होऊ दे, नुकसान आपल्या देशाचंच होणार आहे. देशहितासाठी कृषी कायदे काढून टाका,’ अशी मागणी देखील राहुल गांधी यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्य