‘निकालानंतर ममतांच्या राज्यात हिंसाचार, ९ जणांचा मृत्यू’

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान हिंसाचाराचे गालबोट लागले होते. त्यानंतर हिंसक घटना थांबल्या होत्या. मात्र, काल निकाल लागल्यानंतर पुन्हा एकदा हिंसाचाराचा उद्रेक झाला आहे. निकाल लागल्यापासून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राज्यात विविध ठिकाणी हिंसक घटना घडल्यात. नंदीग्राम येथे भाजपच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला आहे. तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप भाजपने केला आहे.

‘निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये सुरू झालेल्या हिंसाचारात २४ तासांत ९ लोकांचा मृत्यू झाला असून, राज्यात भीतीचं वातावरण आहे. सत्ताधारी पक्ष हातावर हात ठेवून बसला आहे. पोलीस निष्क्रय आहेत. आम्ही राज्यपालांना याबाबत निवेदन दिले आहे’ अशी माहिती पश्चिम बंगालचे भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी दिली.

पश्चिम बंगालमधील भटपारा येथील घोषपारा रोडवरील भाजपा कार्यालय आणि काही दुकानांमध्ये अज्ञात आज लोकांनी तोडफोड केली. परिसरात बॉम्बही फेकण्यात आले. ‘तृणमूलच्या हिंसक कार्यकर्त्यांनी माझे दुकान लुटले. येथे कमीतकमी १० बॉम्ब फेकले’ असे एका रहिवाशाने सांगितले.

सोमवारी नंदीग्राममध्ये गोंधळ झाला असून भाजपच्या कार्यालयात तोडफोडीचा प्रकार झाला. याशिवाय कार्याला आग लावण्याचाही प्रयत्न केला. भाजपने आरोप केला आहे की, हे सर्व तृणमूल काँग्रेसनं केलं आहे. फक्त भाजप कार्यालयच नाही तर अनेक दुकाने आणि घरांमध्येही तोडफोड, आग लावण्याचे प्रकार समोर आले आहेत. भाजपचा आरोप आहे की, जेव्हा पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा घटनास्थळी असलेले समाजकंटक पळून गेले. या घटनेनंतर नंदीग्राममधील वातावरण तणावापूर्ण बनले आहे.

महत्वाच्या बातम्या