fbpx

आरक्षण विरोधी भारत बंद दरम्यान बिहारमध्ये हिंसाचार; आरक्षण समर्थक आणि विरोधक भिडले

bhihar hinsachar

टीम महाराष्ट्र देशा: नौकरी आणि शिक्षणामधील जातीय आरक्षणा विरोधात काही संघटनांकडून भारत बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदचा परिणाम उत्तर भारतामध्ये दिसून येत असून बिहारमधील काही भागात हिंसाचार उसळल्याच दिसत आहे. अनेक भागांमध्ये लोक रस्त्यावर उतरले असून आरक्षण समर्थक आणि विरोधक काही ठिकाणी आमनेसामने आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मागील आठवड्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सुचवलेल्या अॅट्रॉसिटी कायद्यातील बदलांविरोधात २ एप्रिल रोजी दलित संघटनाकडून भारत बंद पुकारण्यात आला होता. यामध्ये उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये हिंसाचार झाला ज्यामध्ये आठ लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. आता या बंदला प्रत्युत्तर म्हणून आरक्षणाविरोधात बंदची हाक देण्यात आली आहे.

बिहारमधील काही ठिकाणी हिंसक जनसमुदायाने जाळपोळ केली आहे. तर अनेक एक्स्प्रेस रेल्वे आंदोलकांनी रोखून धरल्याची माहिती मिळत आहे. तर मध्ये जातीय आरक्षणाचे समर्थक आणि विरोधक आमनेसामने आले. यावेळी गोळीबारही झाला. त्यामध्ये ६-७ पोलीस कर्मचारी जखमी झाले.