भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या लोकशाहीला शोभणाऱ्या नाहीत – मोदी

narendr modi

नवी दिल्ली – लोकशाहीत कुठल्याही प्रकारच्या हिंसेला जागा नसते मात्र गेल्या काही दिवसात त्रिपुरा, केरळ, कर्नाटक या राज्यात आपल्या कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या हे लोकशाहीला शोभणारे नाही, असं भावनिक वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

कर्नाटकात सध्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असून प्रचाराने वेग घेतला आहे. या पार्श्वभूमीवर मोदींनी कर्नाटकातील भाजपाच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांशी नमो अॅपद्वारे संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी बोलताना मोदी म्हणाले की, भाजपाकडे लोक आता विश्वासाने बघायला लागले आहेत ही आश्वासक बाब आहे. भाजपा कार्यकर्ते गेल्या २०-२५ वर्षांपासून तळागळातील लोकांपर्यंत जाऊन काम करीत आहेत. त्यांनी अशीच कामगिरी राखावी, असे आवाहनही मोदींनी कार्यकर्त्यांना यावेळी केले.