मराठा आरक्षण सोलापूर बंदला हिंसक वळण, आंदोलकांनी अनेक गाड्या फोडल्या

सोलापूर: मराठा आरक्षणाच्या मागणीवर आज सोलापूर बंदची हाक देण्यात आली आहे, बंद दरम्यान शिवाजी चौकात झालेल्या दगडफेकीच्या घटनेमुळे बंदला हिंसक वळण लागले आहे. या वेळी पोलीस उपायुक्त पोर्णिमा चौगुले यांची गाडी आंदोलनकर्त्यांकडून फोडण्यात आली आहे. तसेच अनेक गाड्यांवर दगडफेक करण्यात आली आहे.

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आज सकल मराठा समाजाकडून सोलापूर बंदची हाक देण्यात आली आहे, त्यामुळे शहरातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. या शहरातील मुख्य चौक असणाऱ्या शिवाजी चौकात एकत्र येत आंदोलकांनी घोषणा देण्यास सुरुवात केली.

घोषणा देणाऱ्या आंदोलकांना पोलीसांनी घोषणाबाजी करू नका अशी विनंती केल्यावर आंदोलनकर्त्यांनी पोलीसांवर दगडफेकीस सुरुवात केली, यामध्ये पोलीस उपायुक्त पोर्णिमा चौगुले यांच्यासह अग्निशामक दलाची गाडी फोडण्यात आली.