आंध्र प्रदेश मधील ‘दिशा’ कायदा लवकरच महाराष्ट्रात आणणार – गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई : ‘महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला आळा बसावा यासाठी आंध्र प्रदेश राज्यात ‘दिशा’ कायदा लागू करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर गुन्हेगाराला २१ दिवसात फाशी देऊन पीडितेला न्याय मिळवून देणारा दिशा कायदा लवकरच महाराष्ट्रातही आणणार, अशी ग्वाही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

तसेच ते म्हणाले की, ‘या कायद्याची सखोल माहिती घेण्यासाठी राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे एक शिष्टमंडळ गृहमंत्र्यांसह हैद्राबादला गेले होते. या पथकाचे नेतृत्व आय जी श्रीमती. दोरजे करणार असल्याची माहितीही देशमुख यांनी दिली. त्यांच्याकडून सविस्तर अहवाल आल्यानंतर येत्या अधिवेशनात या कायद्याबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊन दिशा कायदा अमलात आणू, असा विश्वास अनिल देशमुख यांनी व्यक्त केला.

Loading...

महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपींना झटपट शिक्षा व्हावी, यासाठी आंध्रात दिशा कायदा बनवण्यात आला आहे. राज्याचे गृहमंत्री देशमुख यांनी आंध्र प्रदेशात जाऊन लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी करण्यात आलेला दिशा कायद्याची माहिती घेतली. आता आंध्रच्या धर्तीवर महाराष्ट्रातही कडक कायदा करणार आहोत, अशी घोषणा दिली.

दरम्यान, देशमुख यांनी विजयवाडामध्ये आंध्रच्या गृहमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याकडून कायद्याचे तपशील जाणून घेतले. महाराष्ट्रात देखील दिशाच्या धर्तीवर नवा कायदा बनवण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
चीनने पाकिस्तानची केली क्रूर चेष्टा; N-95 मास्क ऐवजी चक्क अंडरवेअर पासून बनविलेले मास्क पाठवले
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
तळीरामांना दारूवाचून राहावेना; पठ्ठ्यांनी 'यूट्यूब'वर पाहून घरीच तयार केली दारू
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
कोरोनामुळे उद्धव ठाकरे सरकारचे भवितव्य टांगणीला ; वाचा 'काय' आहे प्रकरण
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
अमेरिकेत 'कोरोना'चं थैमान; डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींकडे मागितला 'मदतीचा हात'
... तर 'लॉकडाऊन'चा कालावधी वाढवावा लागेल; राजेश टोपे यांची माहिती