येरवड्याला म्हणून छिंदमला हलवले नाशिक कारागृहात

नगर कारागृहात इतर कैद्यांची छिंदम विरोधात जोरदार घोषणाबाजी! पोलिसांची उडाली तारांबळ

अहमदनगर: शिवरायांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या निलंबित उपमहापौर श्रीपाद छिंदम याला शनिवारी उपकारागृहात दाखल केल्यानंतर काही वेळातच गोंधळ उडाला. इतर कैद्यांनी मोठ्याने आरडाओरड करून त्याच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव रात्री उशिरा त्याला नाशिक येथील कारागृहात हलविण्यात आले आहे.

छिंदम याला नगरच्या उपकारागृहात दाखल करताच इतर कैद्यांनी त्याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरु केली. त्यामुळे पोलिसांची एकच तारांबळ उडाली. सुरक्षा रक्षकांनी प्रसंगावधान राखून छिंदम याला तातडीने स्वतंत्र बराकीत हलविले. त्यानंतर कारागृह अधीक्षकांनी त्याला इतर ठिकाणी हलवण्यासाठी कारागृह विभागाच्या विभागाच्या अन्य कार्यालयाशी संपर्क साधला. आणि छिंदमला रात्री उशिरा नाशिक येथील कारागृहात हलविण्यात आले.

काय आहे प्रकरण?

श्रीपाद छिंदम हाअहमदनगर महापालिकेचे निलंबित उपमहापौर आहे. छिंदमने त्याच्या प्रभागात काम करण्यासाठी पालिकेकडे कर्मचारी मागितले होते. संबंधित कर्मचाऱ्याने तुम्हाला तुमचे काम करून देतो, मी नाही म्हणालेलो नाही. पण शिवजयंती होऊ दिली तर बरं होईल, अशी विनंती केली. कर्मचाऱ्याच्या उत्तराने चिडलेल्या छिंदमने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले. कर्मचाऱ्यावर आपला रोख झाडताना त्यांची जीभ घसरली, दरम्यान ही ऑडियो क्लिप व्हायरल झाली आहे. संबंधित कर्मचाऱ्याने यूनियनकडे तक्रार केल्यानंतर सर्व प्रकार समोर आला आहे.

You might also like
Comments
Loading...