नाना पटोलेंच्या कार्यक्रमात कोरोना नियमांचे उल्लंघन, २९ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

nana patole

बुलढाणा : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी मेहकर, चिखली, बुलडाणा, खामगाव त्याचबरोबर शेगाव या ठिकाणी विविध कार्यक्रमांना उपस्थित राहून या कार्यक्रमात शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्रित येऊन गर्दी झाल्याने संचार बंदी व कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी शेगाव आणि खामगाव मध्ये २९ काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

गेल्या आठवड्यामध्ये भाजपाकडून ओबीसी आरक्षणासंदर्भात राज्य सरकार विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले होते, त्यावेळी कोविड नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजपा कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते, ही कारवाई सूड बुद्दीने आणि द्वेषातून केली असल्याचा आरोप बुलढाणा भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार आकाश फुंडकर यांनी केलाय.

तर काल झालेल्या नाना पटोले यांच्या दौऱ्यामध्ये देखील नियमांचे उल्लंघन झाले असल्याने या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी आमदार आकाश फुंडकर यांनी केली होती आणि कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता , त्यावरून खामगाव येथे 12 आणि शेगाव येथील 17 कार्यकर्त्यांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

IMP